Shivamrut Milk Agrowon
ताज्या बातम्या

शिवामृत दूध संघाच्या गुंतवणुकीची होणार चौकशी

सहकारी संस्था कलम ८३ अन्वये अकलूजच्या शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची सखोल चौकशी करण्याचे आदेश विभागीय दुग्ध निबंधक डॉ. महेश कदम यांनी दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सहकारी संस्था कलम ८३ अन्वये अकलूजच्या शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची (Shivamrut Milk) सखोल चौकशी करण्याचे आदेश विभागीय दुग्ध निबंधक डॉ. महेश कदम (Dr. Mahesh Kadam) यांनी दिले आहेत. मुख्यतः विजय मल्टिस्टेटमधील गुंतवणुकीबाबत (Investment In Vijay Multi state) ही चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येते.

शिवामृत दूध संघावर मोहिते पाटील गटाचे वर्चस्व आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या संघाचे अध्यक्ष आहेत. शिवामृत दूध संघाने विजय मल्टिस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक आणि मल्टिस्टेटकडून संघाला मिळालेला परतावा, या मुद्द्यावर ही चौकशी होईल. शिवामृत संघाच्या २०१८-१९ च्या लेखा परीक्षण अहवालात संघाची गुंतवणूक ७ कोटी ८२ लाख रुपये दाखवली आहे. त्यापैकी एक कोटी ७८ लाख रुपये ताळेबंदाप्रमाणे दिसत आहेत. मात्र उर्वरित सहा कोटींचा ४ लाखांचा तपशील उपलब्ध नाही.

संघाने विजय मल्टिस्टेटमध्ये ४ कोटी ७४ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय आयसीआय बँकेकडून दहा कोटी रुपयांचे कर्ज सहा टक्के दराने घेतले आहे. पण त्यापैकी सहा कोटी रुपये विजय ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत नऊ टक्के व्याजदराने ठेव म्हणून ठेवले आहेत. या सगळ्यांची चौकशी होणार आहे.

दोन महिन्यांत चौकशी

सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ते चौकशीच्या अनुषंगाने आपला अहवाल विभागीय दुग्ध निबंधकांकडे देतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT