Shivaji University Kolhapur Agrowon
ताज्या बातम्या

Shivaji University Kolhapur : आता शिवाजी विद्यापीठ देणार हवामानाचा अचूक अंदाज, असा होणार कोल्हापूरला लाभ

Team Agrowon

Kolhapur Shivaji University : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आय.आय.टी. एम.) या संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. दरम्यान या करारामुळे हवामानविषयक आधुनिक संशोधनाच्या अनुषंगाने दोन्ही संस्थांमार्फत काम होणार आहे.

आयआयटीएम ही देशातील एक प्रमुख वैज्ञानिक संशोधन संस्था ओळखली जाते. या सस्थेकडून हवामान आणि हवामान अंदाज सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या महासागरीय वातावरण प्रणालीच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने संशोधनकार्य केले जाते. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने हवामान बदलाबाबत निर्धारित केलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर या कराराचा लाभ विद्यापीठातील सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टॅनॅबिलिटी स्टडीज्, भूगोल, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र अधिविभागांसह संगणक विभागासही होणार असल्याची माहिती डॉ. शिर्के यांनी दिली.

या कराराच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरात आणि पन्हाळा येथील विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्र परिसरात वेदर स्टेशन बसवण्यात येणार आहेत. पुढे टप्प्याटप्प्याने या स्टेशनची संख्या वाढविण्यात येईल.

याचा लाभ वातावरणातील तापमान, पर्जन्य, आर्द्रता अशा विविध घटकांचे मोजमाप करण्यासाठी होणार आहे. या करारावर आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, हवामान बदल व शाश्वतता अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर, 'आयआयटीएम'चे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. पवार, एम. एन. पाटील, डॉ. टी. धर्मराज, दादा नाडे, सोमनाथ पवार, राजीव व्हटकर, तुकाराम डोंगळे, राणी पवार, अभिजित पाटील, सुधीर पोवार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT