Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : वाशीम बाजार समिती निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एका मांडवात

Team Agrowon

Washim News वाशीम ः जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीचे (APMC Election) वातावरण तापले आहे. सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत (Washim APMC Election) निवडणुकीची धामधूम वाढली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडी एकत्र येईल, अशी अटकळ असताना वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हात मिळवला, तर दुसरीकडे काँग्रेसने अजूनही आपले पत्ते उघड केले नसल्याने ही निवडणूक दुरंगी की तिरंगी याबाबत उत्सुकता आहे.

वाशीम बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीवर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक राज आहे. आता या बाजार समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगेल अशी अटकळ असताना महाविकास आघाडीतील काँग्रेसने अजूनही युतीसाठी रुकार न दिल्याने आघाडी की बिघाडी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या निवडणुकीत अठरा संचालक निवडून येणार आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १५ व व्यापारी हमाल मतदार संघातून तीन संचालक निवडले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १५ संचालक निवडीसाठी खरी लढत होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे.

त्यामधे वंचित बहुजन आघाडीही या युतीत असताना काँग्रेसने अजूनही आपले पत्ते खुले न केल्याने काँग्रेस महाविकास आघाडीत येणार की एकला चलोची भूमिका बजावणार, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपचेही ‘एकला चलो’

बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकला चलोची भूमिका वठवावी लागणार आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार मतदान करणार असल्याने भाजपला ग्रामीण भागात वट असणाऱ्या नेत्याला पुढे करावे लागेल.

आमदार लखन मलिक यांची ग्रामीण भागातील लोकप्रियता तसेच भाजपचे नेते राजू पाटील राजे, माजी आमदार विजय जाधव यांचा ग्रामीण भागातील प्रचंड जनसंपर्क याचा फायदा भाजपला घेता येईल का हा प्रश्न आहे. तसेच माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा भाजपप्रवेशही या निवडणुकीत कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT