Uddhav Thackeray Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis: हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; उध्दव ठाकरे यांचे खडे बोल

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही,`` अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर निशाणा साधला.

Team Agrowon

``मुख्यमंत्री शिवसेनेचा (Shivsena)असल्याचे बोलले जात आहे. तथाकथित शिवैनिकाला मुख्यमंत्री केले आहे. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही,`` अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात पहिल्यांदाच माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कालच मी नव्या सरकारचे अभिनंदन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ``भाजपने जे आज विचित्र पध्दतीने केले आहे, ते अडीच वर्षापूर्वी अधिकृतपणे का केले नाही? अमित शाह यांनी मला शब्द दिला होता. त्यानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं होतं.

मी तसा करार करायला तयार होतो. तेव्हा ठरल्याप्रमाणं त्यांनी केलं असतं तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद (Chiefministership) मिळालं असतं. महाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती. पण भाजपने शब्द पाळला नाही,`` असे ठाकरे यावेळी म्हणाले.

आरेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी (Uudhav Thackeray) रात्रीस खेळ चाले हे त्यांचं ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला. “आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामाला स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे”, असं ते म्हणाले.

माझ्या पाठीत सुरा खुपसला, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, असे भावनिक आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT