Soybean Cotton Rate | Cotton Rates | Soybean Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean, Cotton Rates : सोयाबीन, कापूस पिकांच्या दरांबाबत धोरण ठरवा

स्वाभिमानी’ने केलेल्या मागण्यांवर कृषिमंत्र्यांचे केंद्राला पत्र

Team Agrowon

अकोला ः राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक (Soybean Cotton Rates) शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी अनुकूल धोरण आखणे गरजेचे आहे, अशी मागणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्राकडे केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता.२९) सत्तार यांची भेट घेत या मुद्द्यांवर मागणी केली होती.

त्यानंतर कृषिमंत्र्यांनी तातडीने या मागण्यांबाबत केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे.  सत्तार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा. यावर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसानही झाले. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

त्यातच सोयाबीन आणि कापसाचे उत्पन्न बाजारात आले असता या दोन्ही पिकांच्या खरेदीदरात घसरण झाली आहे. राज्यात एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के सोयाबीन उत्पादक आहेत. देशभरातील सोयाबीन पिकाच्या एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्र राज्याचा वाटा ४० टक्के आहे. यावर्षी सोयाबीन पिकाचा लागवड खर्च ५७८३ रुपये  प्रति क्विंटलपर्यंत वाढलेला आहे. दुसरीकडे सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल होता. कापसाचीही अशीच स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT