Pune APMC
Pune APMC Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा

Team Agrowon

Pune APMC News पुणे ः प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमणांच्या (Pune APMC Encroachment) विळख्यात सापडलेल्या पुणे बाजार समितीमधील विविध प्रकरणे समोर येत असून, भुसार विभागातील दोन गाळ्यांमधील साइड मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम (Pune APMC Illegal Construction) प्रकरणी पुणे महानगरपालिकेने जप्तीच्या नोटिसा काढल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून साइड मार्जिनमधील बेकायदा बांधकामांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. या बांधकामप्रश्‍नी पालिकेने लाखो रुपयांच्या थकीत कर न भरल्यास जप्ती आणण्यात येईल अशा नोटिसांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे बाजार समितीमधील फळे-भाजीपाला विभागातील गाळ्यांसमोरील अनधिकृत शेड बांधकाम आणि नव्याने उभारण्यात येत असलेल्या डाळिंब यार्ड शेड बांधकाम प्रकरण नुकतेच उघड आले आहे.

भुसार विभागातील गेल्या अनेक वर्षांपासूनचे साइड मार्जिनमधील अतिक्रमणे देखील महानगरपालिकेच्या नोटिसीमुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.

बाजार समितीच्या लेखापरीक्षण अहवालात देखील साइड मार्जिनमधील अतिक्रमणांबाबत ताशेरे ओढण्यात आले आहे. या प्रकरणी भुसार विभागातील व्यापारी न्यायालयात गेले असून गेली अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

बाजार आवारात रिकाम्या जागांवर तात्पुरते शेड मारून त्या जागेवर ताबा घेण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे.

अधिकारी बदलल्यानंतर या जागांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येते आणि वर्षानुवर्षे जागांवर ताबा मारून ठेवण्याचे प्रकार नित्यनियमाने सुरू आहे.

असाच प्रकार नुकताच डाळिंब यार्ड उभारणीच्या निमित्ताने माध्यमांनी समोर आणल्यानंतर हा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहेत.

असे आहे साइड मार्जिन अतिक्रमण प्रकरण

गूळ व भुसार विभागात सुमारे ५०० भूखंड आहेत. महानगरपालिकेने दोन भुखंडांमध्ये साइड मार्जिन सोडून बांधकामाची परवानगी देण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला हाताशी धरून या साइड पट्ट्यांवर अनधिकृत बांधकामे केली आहेत.

या बांधकामांना मिळकतकर आकारणीसाठी पुणे मनपा सातत्याने नोटिसा पाठवत असते. यामध्ये काही व्यापाऱ्यांकडे काही कोटींची थकबाकी असल्याचे समोर आल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणालेले आहेत.

शास्तीकरातील चुकीच्या दुरुस्त्या महानगरपालिकेने करून दिल्यास आम्ही मिळकतकर भरण्यास तयार आहोत. याबाबत पालिका प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे.

- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT