Seed Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Seed Conservation : सातपुडा बीजोत्सवाचे सालईबन येथे आयोजन

नाचणी, हुलगा, भादली, बाजरी या धान्यांचे, फळभाज्यांचे तसेच इतर पिकांचे गावरान देशी बीज संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम आहे.

Team Agrowon

अकोला ः विविध पारंपरिक पिकांचे गावरान बियाणे (Desi Seed) जतन व संवर्धन (Seed Conservation) करण्याच्या उद्देशाने सालईबन (ता. जळगाव जामोद) येथे ५ फेब्रुवारीला बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाचणी (Ragi), हुलगा, भादली, बाजरी (Pearl Millet) या धान्यांचे, फळभाज्यांचे तसेच इतर पिकांचे गावरान देशी बीज संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम आहे.

जेनेटिकली मॉडिफाइड व संकरित बियाणे व विकसित वाणांच्या गर्दीत देशी बियाणे हरवू नये, तसेच गावरान बिजाची लोकप्रियता, राजमान्यता व प्रचार-प्रसार करण्यासाठी हा उपक्रम आहे. २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. भारताने यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे सुपर स्मार्ट फूड म्हणून जगात मान्यता पावलेले भारतीय भरडधान्य संवर्धित करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. उच्च पोषणमूल्ये असलेले देशी बीज बघायचे आहे, त्याचे संवर्धन करायचे आहे.

तसेच या गावरान बीजांपासून बनलेल्या जेवणाची व रानभाज्यांची चव चाखायची आहे आणि निसर्ग संवर्धनाची आवड आहे, अशा व्यक्तींनी या सातपुडा बीजोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बीजोत्सवात शेतकऱ्यांनी स्वतः विषमुक्त पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य, पारंपरिक देशी बियाणे आणि गावगाड्यातील वस्तूंची दालने राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT