Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस

Paddy Plantation : भात खाचरे भरल्याने रखडलेल्या भात लावणीला वेग आला आहे. तर जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या डोंगरी तालुक्यांत भात लावणीची लगबग सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नद्या-नाले वाहू लागले आहेत. मुळशी तालुक्यात पावसाने सध्या चांगली हजेरी लावल्याने मुळा नदीला पूर आला आहे.

भात खाचरे भरल्याने रखडलेल्या भात लावणीला वेग आला आहे. तर जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या डोंगरी तालुक्यांत भात लावणीची लगबग सुरू झाली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागात चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने भात लावणीची लगबग सुरू आहे. या भागात इंद्रायणी, जीर, तांबडा रायभोग, खडक्या या वाणांची लावणी केली जाते.

आधुनिक युगातही बैलजोडीच्या साह्याने चिखलणी करून भात लावणीची पद्धत आजही या भागात पाहावयास मिळते. पाटण, आहुपे व भीमाशंकर ही खोरी भात शेतीचे आगार म्हणून ओळखली जातात.

जूनच्या सुरुवातीला पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी शेतकरी सुखावून गेला. मात्र त्यानंतर पावसाने लपंडाव सुरू केला.

कधी रिमझिम, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण हा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाण्याविना भात लावणी करता येत नव्हती. चार दिवसांपासून पावसाच्या सरी बरसू लागल्याने शेत, नदी, नाले पाण्याने भरू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक सुखावून गेला.

पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू झाली आहे. मापोली येथील लक्ष्मण लोहकरे यांच्या शेतात घरातील मंडळी, मजुरांसह डिंभे मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र बारवे व कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत डामसे यांनी देखील स्वतः भात लावणी करत भात लावणीचा आनंद घेतला.

मुळशी तालुक्यात झालेला पाऊस

तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विविध ठिकाणचा शनिवारी (ता. २२) झालेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे -

पौड - १४ मिमी, पिरंगुट ७ मिमी, घोटवडे २४ मिमी, थेरगाव १२ मिमी, माले २६ मिमी, मुठा ४२ मिमी. याशिवाय मुळशी धरण विभागातील पाऊस पुढीलप्रमाणे - मुळशी २६ मिमी, माले २३ मिमी, दावडी ११७ मिमी, ताम्हिणी ११२ मिमी, शिरगाव ६५ मिमी, तर आंबवणे १७० मिमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT