Kolhapur Direct Pipeline agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Direct Pipeline : कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईचे पाणी लवकरच, योजनेच्या जॅकवेलमध्ये पोहोचले पाणी

sandeep Shirguppe

Kolhapur Municipal : मागच्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन द्वारे काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याचे काम सूरू आहे. योजनेचा महत्वाचा टप्पा पार पडला आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे.

दरम्यान थेट पाईपलाईनच्या जॅकवेलचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. पावसामुळे या जॅकवेलपर्यंत पाणी आल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. पाटील यांनी ही पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सतेज पाटील यांनी सोशल मिडीयावर याबाबत माहिती दिली आहे. स्वप्नपूर्तीचा क्षण. संततधार पावसामुळे काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेटपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचले आहे. आपल्या स्वप्नांना निसर्गाचीही साथ लाभत आहे. एक वेगळेच आत्मिक समाधान आज मनात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान काळम्मावाडी धरण परिसरात धुवाँधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील बॅक वॉटर परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणातील कॉपर डॅमच्या काठावर पाणी आहे. त्यामुळे थेट पाईपलाईनसाठी उभारलेल्या इंटेकवेलमध्ये आज (ता.०७) कधीही पाणी येऊ शकते, अशी स्थिती आहे.

थेट पाईपलाईन योजनेत पहिल्यांदाच काळम्मावाडी धरणाचे पाणी येणार असल्याने अधिकारी यांच्यासोबत नेत्यांनाही उत्सुकता लागली आहे. धरण क्षेत्रात थेट पाईपलाईन योजनेचा पहिला भाग आणि तेथून जॅकवेलमध्ये महापालिकेतून आहेत. हा इंटेकवेल आहे.

त्यानंतर इन्स्पेक्शन वेल क्र. १ व क्र. २ येतात. यातून पाणी जॅकवेलमध्ये येणार आहे. पावसाळ्यात धरणातील पाणी येणार असल्याने जॅकवेल स्वच्छ करण्यात आली आहेत. धरण क्षेत्रातील पाणी येणारी सर्व कामे पूर्ण करण्यात आली आता ट्रान्सफर्मर बसविण्याचे काम सुरू आहे. इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT