DCC Bank Satara Agrowon
ताज्या बातम्या

Education Loan : शैक्षणिक कर्ज वितरणातही सातारा जिल्हा बॅंक अव्वल

Satara DCC Bank : शेतकऱ्यांच्या मुलांना देशांतर्गत व परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने शैक्षणिक कर्ज उपलब्ध केले आहे.

Team Agrowon

Satara News : शेतकऱ्यांच्या मुलांना देशांतर्गत व परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने शैक्षणिक कर्ज उपलब्ध केले आहे. सोसायटीच्या माध्यमातून ४० कोटी ८८ लाख रुपयांचे, थेट शैक्षणिक कर्ज आठ कोटी रुपयांचे २९३२ सभासदांना वाटप केले आहे. जिल्हा बॅंक नफ्यातून तरतूद करत असल्याने हे कर्ज शून्य टक्के दराने पडत आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाला मागणी आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यावर भर दिला जात आहे. तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्क्याने शेतकऱ्यांना पडत आहे. त्यासाठी केंद्राच्या व राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून व्याज परतावा मिळत आहे.

बॅंकेने शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांना देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेप्रमाणे जिल्हा बॅंकही शैक्षणिक कर्ज उपलब्ध करत आहे. यामध्ये दोन माध्यमातून कर्ज दिले जात आहे. एक थेट कर्ज व सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज दिले जाते.

परदेशात शिक्षण घेण्यासाठी ४० लाख, तर देशांतर्गत शिक्षणासाठी ३० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी सोसायटी व थेट कर्जासाठी १० टक्के व्याजदर आकारला जातो. या कर्जाचा आतापर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

नफ्यातून व्याज परताव्यासाठी तरतूद केल्यामुळे हे कर्ज संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना शून्य टक्के व्याजाने पडत आहे. सोसायटीच्या माध्यमातून २७८५ शेतकरी सभासदांच्या मुलांना बॅंकेने ४० कोटी ८८ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्जवाटप केले आहे. तर थेट शैक्षणिक कर्जवाटपातून १७४ सभासदांना आठ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. त्यामुळे तीन हजार जणांनी बॅंकेच्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT