Gadgebaba Gram Swachhta Abhiyan  Agrowon
ताज्या बातम्या

Gram Swachhta Abhiyan संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला झाली सुरुवात

विविध पुरस्कार मिळणार ः १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Team Agrowon

नगर ः ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून (State Government) विविध अभियाने राबविण्यात येतात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ( Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan) पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या अभियानास सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

गावागावांत निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्ये आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलूंतील एक सर्व समावेशक स्पर्धा राबवून त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करत नागरिक, कर्मचारी, तसेच लोक प्रतिनिधी, सक्रिय सहभाग नोंदवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. या अभियानात सहभागी घेणाऱ्या गाव, प्रभागाला स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार दिले जाणार असून त्यात जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम ६० हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम ६ लाख प्रथम, द्वितीय ४ लाख, तृतीय ३ लाख. विभाग स्तरावर प्रथम १२ लाख, द्वितीय ९ लाख, तृतीय - ७ लाख. राज्यस्तर - प्रथम ५० लाख, द्वितीय ३५ लाख, तृतीय ३० लाख. या शिवाय जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या ग्राम पंचायती वगळून जिल्हा , विभाग व राज्य स्तरावर संबंधित ग्राम पंचायतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय स्वर्गीय वसंतराव नाईक घनकचरा व सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन जिल्हास्तर ५० हजार, विभागस्तर ७५ हजार व राज्यस्तर ३ लाखांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन जिल्हास्तर ५० हजार, विभागस्तर ७५ हजार व राज्यस्तर ३ लाखांचे पुरस्कार देण्यात येणार आहे. या शिवाय (कै.) आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार पुरस्कार शौचालय व्यवस्थापनासाठी देण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्याचे नगरचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT