Sangli DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक कारभाराची चौकशी सुरू

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीवरील स्थगिती उठविल्यानंतर पाच जणांच्या समितीकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

सांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sangli DCC Bank) गैरव्यवहाराच्या (DCC Bank Inquiry) चौकशीवरील स्थगिती उठविल्यानंतर पाच जणांच्या समितीकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या पथकाने बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

चौकशी समितीला महिनाअखेरीस अहवाल सादर करावा लागणार आहे. संस्थांची मालमत्ता विक्री, बेकायदा कर्जवाटपासह कर्जे निर्लेखना प्रकरणांचा समावेश आहे. याबाबतची कागदपत्रे मागवल्याचे समजते.

जिल्हा बँकेमध्ये चौकशी समितीचे अध्यक्ष, विभागीय सहनिबंधक छत्रीकर यांच्यासह विशेष लेखापरीक्षक कोल्हापूर शीतल चोथे, विशेष लेखा परीक्षक सांगली संजय पाटील, विशेष लेखापरीक्षक कोल्हापूर अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

बँकेकडून सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटींचे कर्ज शिफारस नसताना देणे, महांकाली कारखान्याची कर्जवसुली न करणे, ‘स्वप्नपूर्ती शुगर्स’ला चुकीच्या पद्धतीने २३ कोटींचे कर्जवाटप, २१ तांत्रिक पदांची बनावट कागदपत्रांच्या आधारे भरतीबाबत तक्रार केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

Grape Pruning: द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

Agri Shop License Suspension: पंधरा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाड यांचे विधान विकृत : सपकाळ

Summer Bajra Harvesting: उन्हाळी बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT