Urea Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Urea Shortage : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत युरियाची जादा दराने विक्री

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात युरिया खताची किरकोळ किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केली जात आहे. काळाबाजार करणाऱ्या खत विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात युरिया खताची (Urea Fertilizer) किरकोळ किंमतीपेक्षा जास्त दराने (Urea Rate) विक्री केली जात आहे. काळाबाजार करणाऱ्या खत विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

या दोन जिल्ह्यांत गहू, ऊस आदी पिकांना मात्रा देण्यासाठी युरिया खताची खरेदी शेतकरी करत आहेत.ग्रामीण भागातील तसेच अडवळणाच्या गावातील शेतकऱ्यांची नड पाहून खत विक्रेते युरियाच्या प्रतिपिशवी मागे १०० ते १५० रुपये जास्तीचे घेत आहेत. परभणी जिल्ह्यात डिसेंबरअखेर पर्यंत ३ हजार ८३२ टन आणि हिंगोली जिल्ह्यात १ हजार ८२८ टन युरिया शिल्लक होता.

अनेक कृषी केंद्रावरील दर्शनी भागावर फलक लावलेले दिसत नाहीत. अनेक केंद्रावर फलक असले तरी त्यामध्ये दैनंदिन उपलब्ध निविष्ठांचा साठा, दर याची माहिती अद्ययावत केली जात नाही. अनेक ठिकाणी खत विक्रीच्यावेळी पॉस मशिनचा वापर केला जात नाही.त्यामुळे खताच्या उपलब्धते बाबत कृषी विभागातील देखील अद्ययावत माहिती मिळत नाही.

अनेक खत विक्रेत्यांनी युरिया खताची साठेबाजी करत असल्याच्या तक्रारी आहेत.जादा दराने विक्री करत असल्याबाबत लेखी तक्रारी येत नाहीत तोपर्यंत कारवाई करता येत नाही. जास्त दराने विक्री बाबतच्या तक्रारी तत्काळ करणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसात युरिया खत उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला

Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शन बारीसाठी ‘पाॅली कार्बोनेट’

White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक

SCROLL FOR NEXT