Rabi Seed Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Seed : विद्यापीठाच्या ३६२ क्विंटल रब्बी बियाण्याची विक्री

यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेल्या हरभरा, ज्वारी, करडई, गहू या पिकांच्या मिळून एकूण ३६२.६० क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.

Team Agrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMK) उत्पादित केलेल्या हरभरा (Chana), ज्वारी (Jowar), करडई, गहू या पिकांच्या मिळून एकूण ३६२.६० क्विंटल बियाण्याची (Seed) विक्री झाली आहे.

परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध ठिकाणच्या प्रेक्षेत्रावर उत्पादित रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई, गहू, जवस या पिकांचे बियाणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. हरभरा च्या एकूण ८५.९० क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

त्यात फुले विक्रम वाणाचे ४८.४० क्विंटल, बीडीएनजीके-७९८ या वाणाचे ४.८० क्विंटल, बीडीएनजी -७९७ वाणाचे ३२.७० क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. ज्वारीच्या ३९.९२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. त्यात सीएसव्ही १८ वाणाचे १.९६ क्विंटल, एसपीव्ही १४११ वाणाचे १३.९६ क्विंटल, एसपीव्ही २४०७ वाणाचे २४ क्विंटल बियाणे आहे.

करडईच्या ११२.८३ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. त्यात पीबीएऩएस ८६ वाणाचे ७८.६४ क्विंटल, पीबीएनस १२ वाणाचे ३३.९४ क्विंटल, पीबीएनएस ४० वाणाचे ४५ किलो बियाणे आहे. गव्हाच्या १०९.६० क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

त्यात एनआयएडब्लू ३०१ या वाणाचे ४३.६० क्विंटल, एनआयएडब्ल्यू १९९४ वाणाचे ६५.६० क्विंटल, एनआयएडब्लू १४१५ या वाणाचे ४० किलो बियाणे आहे. जवसाच्या एलएसएल ९३ वाणाच्या १४.३५ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT