Mahabeej Agrowon
ताज्या बातम्या

Mahabeej : महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सचिन कलंत्रे

राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशानुसार, कलंत्रे यांनी पदाचा कार्यभार संतोष आळसे यांच्याकडून स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा (महाबीज) (Mahabeej) च्या व्यवस्थापकीय संचालकपदी सचिन कलंत्रे यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याचे आदेश सोमवारी (ता.१२) शासनाकडून काढण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले कलंत्रे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जात पडताळणी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशानुसार, कलंत्रे यांनी पदाचा कार्यभार संतोष आळसे यांच्याकडून स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे सहसंचालक असलेले आळसे यांच्याकडे महाबीजच्या या पदाचा पदभार आहे.

महाबीजला सातत्याने प्रभारी अधिकारी मिळत असल्याचा परिणाम मागील काही वर्षात कामकाजावर पडला आहे. आयएएस दर्जाचे हे पद असूनही त्याठिकाणी कुठलाही अधिकारी पूर्णवेळ काम करण्यासाठी तयार होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

पूर्णवेळ आयएएस दर्जाचे अधिकारी काम करायला या पदावर तयार नसल्याने प्रशासनाला व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार प्रभारींकडून चालवावा लागण्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT