Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe : एक लाखाची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक

शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल खात्यात जमा केल्याचे बक्षीस म्हणून एक लाखाची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून अटक केली.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या (Finance Commission) कामाचे बिल खात्यात जमा केल्याचे बक्षीस म्हणून एक लाखाची लाच (Bribe) मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला (Rural Development Officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून अटक केली.

गोपीचंद दादा गवळी (वय ५६, पद - ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय बोराळे, ता. मंगळवेढा, रा. अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार याचे मित्र हे कॉन्ट्रक्टर असून, त्यांचे मित्रानी मौजे बोराळे, ता. मंगळवेढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे व जिल्हा परिषद सेस निधीअंतर्गत केलेल्या कामाच्या बिलासंदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते.

सदर कामाच्या बिलाची रक्कम खात्यात जमा केल्याबाबत ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांच्याकडे बक्षीस/मोबदला म्हणून एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता ५०,००० रुपये मागणी केल्याचे लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत स्पष्ट झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार प्रमोद पकाले, पोलिस शिपाई उमेश पवार, रवी सण्णके, श्‍याम सुरवसे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT