Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate Crisis : पाच एकर कांद्यात फिरवला रोटर

कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी कांद्याकडे वळाले आहेत. पिकाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत बी-बियाण्यांपासून खतांपर्यंत आणि लागवडीपासून काढणीपर्यंत अमाप खर्च करत आहेत.

Team Agrowon

आशिष निंबोरे

Onion Rate Crisis मिरजगाव, ता. कर्जत ः कांदा लागवडीतून (Onion Cultivation) आर्थिक स्थिती सुधारेल, या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्याचे पीक घेत आहेत. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा (Onion Rate) आल्याने भाव कोसळले आहेत.

मजुरीचा खर्चही निघत नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या पाच एकर कांदा पिकांत रोटाव्हेटर (Rotavator) फिरवून निषेध केला. कर्जत तालुक्यातील नागापूर येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कांदा पीक शेतातच मोडून टाकले. नगर जिल्ह्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी हतबल आहेत.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी कांद्याकडे वळाले आहेत. पिकाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत बी-बियाण्यांपासून खतांपर्यंत आणि लागवडीपासून काढणीपर्यंत अमाप खर्च करत आहेत.

मात्र, कांदा काढणीला आल्यावर भाव गडगडले आहेत. त्यामुळे मजुरीचा खर्चही शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे. लेट खरिपात लागवड झालेल्या कांद्याची काढणी सुरु झाली आहे. काही शेतकऱ्यांनी खरपातील कांदा दराअभावी चाळीत साठवून ठेवला आहे.

बाजारभाव कोसळल्याने नागापूर (ता. कर्जत) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी काढणीला आलेल्या पाच एकर कांदा पिकात रोटाव्हेटर फिरवून निषेध नोंदविला.

लाखो रुपयांचा खर्च करून पदरी निराशा पडत असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. चार ते सहा रुपयांनी कांदा मातीमोलाने विकावा लागत आहे.

त्यामुळे पीक शेतातून काढून बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे परवडत नाही. त्यामुळे वैतागून जोमदार कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवला. सरकारला आता तरी जाग येईल आणि कांदा उत्पादकांना सरकार अनुदान स्वरूपात मदत करील, अशी अपेक्षा शेतकरी सुभाष निंबोरे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT