soybean Crop Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Crop : सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर

रोगराई तसेच ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन होणार नाही. हे लक्षात येताच शेतकरी सोयाबीन नष्ट करत आहेत.

टीम ॲग्रोवन

उजनी, जि. लातूर : रोगराई तसेच ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे (Heavy Rainfall) उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचे (Soybean) अपेक्षित उत्पादन होणार नाही. हे लक्षात येताच शेतकरी सोयाबीन नष्ट करत आहेत. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शासन व पीक विमा (Crop Insurance) कंपनीकडे मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या सोयाबीन पिकाची यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. बियाणे, खते, पेरणी, आंतरमशागत, फवारण्या आदींसाठी लाखाच्या घरात खर्च केला आहे.

त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे दुबार पेरणी केली आहे. परंतु शेतात असलेल्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खर्च करूनही अपेक्षित उत्पादन निघणार नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर येथील जवळपास २० शेतकऱ्यांनी सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवून पिके नष्ट केली आहेत.

पिकाचा चाऱ्यासाठी वापरअनेक शेतकरी सोयाबीनवर रोटावेटर फिरवत असताना आता काही शेतकऱ्यांनी पिकाला फळधारणा झाली नाही. याच सोयाबीन पिकांमध्ये चरण्यासाठी जनावरे सोडल्याचे चित्र आहे. यंदाचा खरीप शेतकऱ्यांच्या अंगलट असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

तीन एकरांवर सोयाबीनच्या ३३५ वाणांची पेरणी जुलैमध्ये केली होती. यासाठी माझा ५० हजारांवर खर्च झाला आहे. त्या वेळी बहुतांश पीक गोगलगायीने फस्त केले. त्यानंतर उर्वरित पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे पिकांची पूर्ण वाढ झाली नाही. शेंगाची लागणही झाली नाही. त्यामुळे पीक नष्ट करावे लागले.

- सल्लाउद्दीन मुलाणी, शेतकरी, उजनी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT