Raju Shetti
Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Factory : उसाच्या काटामारीतून साडेचार हजार कोटींचा दरोडा ः शेट्टी

Team Agrowon

पंढरपूर : एक रक्कमी एफआरपीची (FRP) लढाई जिंकली असली तरी काटामारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरुच आहे.

यापुढची लढाई काटामारीच्या विरोधात असेल असे जाहीर करत, राज्यातील साखर कारखानदारांनाकडून (Sugarcane Factory) काटामारीतून दरवर्षी ऊस उत्पादकांच्या घरावर साडेचार कोटींचा दरोडा टाकला जातो,असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Ex MP Raju Shetty) यांनी आज पंढरपुरात केला.

रोपळे (ता.पंढरपूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महादेव रोकडे यांनी ऊस वजन काटा उभारला आहे.

राजू शेट्टी यांच्या हस्ते शनिवारी (ता.१४) सोलापूर जिल्ह्यातील स्वाभीमानीच्या या पहिल्या वजन काट्याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी‌ बोलताना शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात दरवर्षी १३ कोटी ३२ लाख टन उसाचे गाळप होते. यामध्ये सहकारी व खासगी साखर कारखानदार मिळून दरवर्षी एक कोटी २० लाख टन उसाची चोरी करतात.

त्यातून सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची साखर चोरी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दरोडा टाकला जातो. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. तरीही शेतकरी लुटणाऱ्या साखर कारखानदारांचेच उदो उदो करता.

पुढील वर्षापासून प्रत्येक कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवावेत असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती.

मात्र त्याचे आदेश अद्याप न निघाल्याने कारखाने एक रक्कमी एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. कारखानदारांच्या मानगुटीवर बसून एफआरपीची रक्कम घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

या वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी अध्यक्ष समाधान फाटे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT