Extremely Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain: कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ सुरूच

कासारी मध्यम प्रकल्प, गेळवडे (ता. शाहूवाडी) येथील धरण पाणलोट (Catchment Area) क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

अॅग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरूच असल्याने नद्यांचे पाणी द्रुतगतीने वाढत आहे. विविध नद्यांवरील ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अजून जिल्ह्यातील बहुतांश धरणांतून जादा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला नाही.

कासारी मध्यम प्रकल्प, गेळवडे (ता. शाहूवाडी) येथील धरण पाणलोट (Catchment Area) क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणाच्या सांडव्यातून व विद्युत विमोचकाद्वारे कासारी नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पंचगंगा (Panchaganga) नदी इशारा पातळीकडे जाऊ लागल्याने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (Disaster Management Team) सक्रिय झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी करून सूचना करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी (ता. १३) दिवसभर शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी करून मार्गदर्शक सूचना केल्या. त्याचबरोबर नागरिकांना स्थलांतर (Migration) करण्याची वेळ आल्यास निवारा शेड तसेच जनावरांना ठेवण्याच्या ठिकाणांची पाहणी त्यांनी केली.

विविध योजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सूचना केल्या. १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटल्याने अन्य मार्गाने वाहतूक केली जात आहे. धामणी खोऱ्यातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड जागा निश्चित करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी जागांची निश्‍चिती केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. स्थानिक जवानांनाही जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT