Paddy Harvesting  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : आंबेतर्फेतील शेतात भातपीक कापणी प्रयोग

महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी १९४४ पासून खरीप व रब्बी हंगामात पीककापणी प्रयोग राबवण्यात येत आहे.

Team Agrowon

नवीन पनवेल : महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची (Crop Production) माहिती अंतिम करण्यासाठी १९४४ पासून खरीप व रब्बी हंगामात (Rabi Season) पीककापणी प्रयोग राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीककापणी प्रयोगासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारित यादीनुसार गावनिहाय एकूण १८ गावांसाठी प्रत्येकी दोन असे एकूण ३६ पीककापणी प्रयोग निश्चित केले आहेत. त्यानुसार आंबेतर्फे वाजे येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतात सुवर्णा या भातपिकाची कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आली.

सरकारच्या निर्देशानुसार सर्व पीककापणी प्रयोग महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांना नेमून दिले आहे. संबंधित पर्यवेक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयोग यशस्वी करून त्याची माहिती सरकारच्या सीसीई-अ‍ॅग्री या अ‍ॅपवर अपलोड केली जात आहे.

पनवेल तालुक्यातही खरीप हंगामासाठी पीककापणी प्रयोगासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारित यादीनुसार १८ गावांसाठी प्रत्येकी दोन असे एकूण ३६ पीककापणी प्रयोग निश्चित केले आहेत.

त्या अनुषंगाने नुकतेच आंबेतर्फे वाजे येथील शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाची कापणी प्रयोग करण्यात आला. त्या वेळी नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सीताराम वारगडा हे प्रयोगासाठी उपस्थित होते.

प्रयोगातील आकडेवारी ॲपवर

सरकारला पीक उत्पन्नाचा अंदाज, शेतमालाची खरेदी, शेतमाल निर्यात धोरण अशा विविध बाबींसाठी पीककापणी प्रयोगातील आकडेवारीची आवश्यकता भासते. यासाठी कापणी प्रयोग पूर्ण करून १५ नोव्हेंबरला महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांना नेमून दिल्या. हे प्रयोग सरकारच्या ॲपवर पाठवले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT