Valu
Valu Agrowon
ताज्या बातम्या

Akola News : वाळू घाटांचे संरक्षण करणार महसूल-पोलिस पथके

Team Agrowon

अकोला ः जिल्ह्यातील ३७ वाळू घाटांचा ई-लिलाव (Valu Lilav) करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. या काळात या वाळू घाटांतून अवैध उत्खनन रोखण्यासाठी या घाटांवर पथकांद्वारे लक्ष ठेवले जाईल. महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांचे (Revenue and Police Officers) पथक वाळूचे संरक्षण करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील घाटांच्या लिलावाचे नियोजन खनिकर्म विभागामार्फत करण्यात आले आहे.

त्या अंतर्गत जिल्ह्यातील ३७ वाळू घाट ई-लिलावासाठी निश्‍चित झाले आहेत. या वाळू घाटांचे तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीची प्रक्रिया झाली.

दरम्यान, पर्यावरण विषयक समितीची परवानगी घेऊनच वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात येईल. लिलाव झालेला नसल्याने त्यामधून अवैधपणे वाळू उपसा होण्याची शक्यता आहे.

असे झाले तर पुढील काळात हे घाट घेणाऱ्यांना कमी प्रमाणात वाळू उपलब्ध राहील. परिणामी त्यांचे नुकसान होऊ शकते. याबाबत काही जणांनी खनिकर्म विभागाकडे तक्रारी दाखल केल्या.

याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित वाळू घाटांवर महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

स्थायी पथकामध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलिस कर्मचारी व तलाठ्याचा समावेश असेल. एका दिवसाला तीन शिफ्टमध्ये पथके काम करतील.

प्रत्येक शिफ्टमध्ये दोन कर्मचारी, महिला कर्मचारी असेल तर फक्त दिवसाच्या दोन शिफ्टमध्ये नेमावे. तसेच पोलिस शिपायाची नियुक्ती रात्रीच्या शिफ्टमध्ये करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तालुकानिहाय वाळू घाट

अकोला तालुका ः कपिलेश्‍वर, वडद बुद्रुक, एकलारा, उगवा, कट्यार, म्हैसांग

अकोट ः केळीवेळी, पिलकवाडी

तेल्हारा ः तळेगांव, पातुर्डा, वांगरगाव मूर्तिजापूर लाखपुरी, विरवाडा, दापुरा कोळसारा, खापरवाडा, खैरी, घुंगशी, हसनापूर दुर्गवाडा, लोनसाना, सांगवामेळ, सांगवी, बपोरी, पिंगळा

बाळापूर ः बहादुरा, काजीखेड, हिंगणा शिकारी, निंबी, मोखा, सागद, मांजरी, जानोरी मेळ, हाता, लोहारा, डोंगरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT