Monsoon Update  Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणार.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.

टीम ॲग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) (Monsoon Rainfall) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा देखील लांबणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला (Monsoon Return Journey) निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी मॉन्सून वारे (Monsoon Winds) राजस्थानातून माघारी फिरले होते. परतीसाठी पोषक हवामान तयार झाल्याने यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानात मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वायव्य भारतात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार झाल्या.

त्यामुळे सर्वसाधारण वेळेच्या आधी मॉन्सून वायव्य भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता निवळली. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनच्या राजस्थानातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख १ सप्टेंबर होती. मात्र २०२० मध्ये मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

राजस्थानातून मॉन्सूनचा प्रवास अद्यापही सुरू झालेला नाही. गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेला मॉन्सून २५ ऑक्टोबर रोजी देशातून परतल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.

परतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यंदाच्या हंगामात सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी २९ मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. तळकोकणात ९ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने १५ जून रोजी जवळपास महाराष्ट्र व्यापला. पुढील वाटचालही काहीशी अडखळत झाली. तरीही नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच मॉन्सूनने देश व्यापला. २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोचला होता. राज्याच्या अनेक भागात अद्यापही जोरदार पाऊस कोसळत असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT