Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : नगर जिल्ह्यात पीकविम्याला प्रतिसाद

Nagar Crop Insurance : खरीप पिकांना अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, म्हणून पीकविमा योजना राबवली जात आहे.

Team Agrowon

Nagar News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी विमा भरण्यासाठीचे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने शेतकऱ्यासह ‘आपले सरकार केंद्र’चालक त्रस्त झाले आहेत. दिवसा सर्व्हरला वेग नसल्याने केंद्रचालक रात्री जागून विमा भरत आहेत. पीकविम्यासाठी लागणारे ऑनलाइन सातबारा, आठ-अ चा उतारा मिळण्यासाठीही अडचणी येत आहेत.

खरीप पिकांना अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, म्हणून पीकविमा योजना राबवली जात आहे. यंदा शासनाने एक रुपयांत पीक विमा योजना राबवण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. यंदा विम्यासाठी खास पोर्टल विकसित केले आहे. पीकविमा अर्ज सादर करण्यासाठी पोर्टलला सुरवातीचे काही दिवस अर्ज सादर केले जात नव्हते.

मध्यंतरी पोर्टल व्यवस्थित सुरू होते. मात्र, पुन्हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोर्टलला तांत्रिक अडचणी येत आहेत. पोर्टलला वेग नाही. त्यामुळे एक अर्ज पूर्ण करण्यासाठी कधी-कधी पंधरा मिनिटापासून अर्ध्या तासाचा वेग लागतो. त्यामुळे अर्ज येत असलेले अडथळे कायम आहेत.

दिवसभर केंद्रावर शेतकरी येत असल्याने त्यांच्याकडून फक्त अर्ज भरून घेणे, सात-बारा, आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र हे भरून घेण्यातच वेळ जात आहे. केंद्रचालकांना रात्रभर जागून सदर अर्ज भरावे लागत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे केंद्रचालकही त्रस्त झाले आहेत.

सातबारा, आठ अ चा उताराही मिळवताना कसरत करावी लागत आहे. नगर जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पाच लाखापेक्षा अधिक शेतकरी यात सहभागी झाले आहेत. मात्र अजूनही शेतकरी पिक विमा भरण्याचे राहिले असले तरी सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे तीन दिवसात राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईल का हा प्रश्न सतावत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT