Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : नांदेडमध्ये एक रुपयात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Crop Insurance Scheme Nanded : प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गत यंदा शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गत यंदा शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे खरीप हंगाम २०२३ मध्ये पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण वाढल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ता. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील दहा लाख ३३ हजार ८०५ अर्जदार शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. यात शेतकऱ्यांनी सहा लाख ३९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ करिता जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नेमणूक केली आहे. यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद या सहा पिकांना विमा भरण्याची मुभा शेतकऱ्यांना उपलब्ध करुण दिली आहे. दरम्यान यंदा शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य शासन भरून घेणार आहे.

यामुळे यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीकविमा योजनेत सहभागी होता येत आहे. संरक्षीत रक्कम तीन हजार ४०२ कोटी रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. मागीलवर्षी संपूर्ण हंगामात दहा लाख ६७ हजार ८०४ अर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता.

यंदा विमा भरण्यासाठी सहा दिवस शिल्लक असताना मागील वर्षाच्या तुलनेत ९६ टक्के अर्जदारांनी यात सहभाग घेतला आहे. यामुळे या योजनेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद लाभला आहे.

पीकविमा भरण्याला अडचण

पीकविमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुले आहे. अंतिम तारीख जवळ येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी घाई केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून विमा भरण्यासाठी साइड चालत नसल्याने विमा भरण्यासाठी अडचणीचे जात आहे. यामुळे विमा भरण्याच्या तारीख वाढवून द्यावी अशी मागणी समोर येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Compensation: सातारा जिल्ह्यातील ७८२ शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी मदत मंजूर

Illegal Cotton Seeds: अमरावतीत ८.०५ लाखांचा अवैध बियाण्यांचा साठा जप्त

Fertilizer Shop License Suspension: भंडारा जिल्ह्यातील ३६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Fertilizer Price: खताची जादा दराने विक्री केल्यास दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Raghav Chadha: राघव चड्ढांसह 'आप'च्या ७ खासदारांचा 'भाजप'च्या यादीत समावेश, राज्यसभेतील 'एनडीए'चे संख्याबळ १४० पार

SCROLL FOR NEXT