Potkharaba Land Agrowon
ताज्या बातम्या

Grazing Land : गायरान जमिनीवरील वास्तव्य नियमाधीन होणार

राज्यातील गावात गावठाण जमिनीवर व शासकीय, गायरान जमिनीवर निवासाच्या गरजेपोटी स्थानिक ग्रामस्थांनी कच्च्या व पक्क्या स्वरूपात घरे बांधलेली आहेत.

Team Agrowon

सोलापूर ः राज्यातील गावात गावठाण जमिनीवर व शासकीय, गायरान जमिनीवर निवासाच्या गरजेपोटी स्थानिक ग्रामस्थांनी कच्च्या व पक्क्या स्वरूपात घरे बांधलेली आहेत. ही घरे शासनाच्या २०१८ च्या परिपत्रकानुसार नियमित करा, अन्यथा सरपंच परिषद रस्त्यावर उतरेल असा इशारा सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी दिला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंबंधीचा आदेश काढत ही बांधकामे नियमाधिन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास मंत्री व महसूल मंत्री यांची भेट घेऊन ही मागणी केलेली होती.

सदर मागणीचा विचार करून व ग्रामीण भागातील तीव्रता लक्षात घेता राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गाव, तालुका व जिल्हा स्तरावर कालबद्ध कार्यक्रम दिला व तत्काळ शासकीय जागा वरील रहिवासी अतिक्रमणे नियमीत करण्याचे आदेश जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागातील सर्व गोरगरिबांच्या घराचा प्रश्न मिटणार आहे, असेही जाधव म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Farming: खानदेशात १० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

Farmer Leaders Clashes: कांदादर बैठकीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांत खडाजंगी

Pune APMC: भुसार वस्तूंवरील शुल्कामुळे महागाईत भर पडणार

Mumbai APMC Action: मुंबई बाजार समितीत अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

Monsoon 2026: मॉन्सूनची आगेकूच

SCROLL FOR NEXT