Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : सेंद्रिय शेतीच्या अभ्यासासाठी संशोधक सिद्धगिरीत येतील

सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक कणेरी येथील सिद्धगिरी मठावर येथील, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. ११) व्यक्त केला.

Team Agrowon

कोल्हापूर : सेंद्रिय शेतीचा अभ्यास (Organic Farming) करायला जगभरातील संशोधक कणेरी येथील सिद्धगिरी मठावर (Siddhagiri Math) येथील, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी (ता. ११) व्यक्त केला.

‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या तयारीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिंदे सिद्धगिरी मठावर आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

सुमारे ६५० एकर विशाल परिसरात उत्सवाची तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या उत्सवात ३० ते ४० लाख लोक सहभागी होणार आहेत, हे गृहीत धरून शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनासाठी सिद्धगिरी मठाला सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

यापुढेही मदत राहील, असे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी या वेळी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्त्वांच्या गॅलरी, मुख्य सभा मंडपासोबतच सोळा संस्कार, आरोग्य अशा गॅलरीना भेट देऊन पाहणी केली.

सिद्धगिरी गोशाळा, सिद्धगिरी हॉस्पिटल व सिद्धगिरी गुरुकुलला भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. मठाधीपती श्री काडसिद्धेश्वर यांनी माहिती दिली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT