Cotton Color  Agrowon
ताज्या बातम्या

Colored Cotton Verity : रंगीत कापसाचे दर्जेदार वाणासंबंधी होणार संशोधन

करारानुसार नैसर्गिक रंगीत कापसाचे दर्जेदार वाण विकसित करण्यासह कापसाच्या सरळ वाणात बीटी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, कापसातील यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन यावर संशोधन केले जाईल.

Team Agrowon

Colored Cotton Verity परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) (आयसीएआर) अंतर्गत मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी सिरकॉट) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात गुरुवारी (ता.१७) सामंजस्‍य करार करण्‍यात आला.

या करारानुसार नैसर्गिक रंगीत कापसाचे दर्जेदार वाण (Color Cotton Verity) विकसित करण्यासह कापसाच्या सरळ वाणात बीटी तंत्रज्ञानाचा (BT Technology) अंतर्भाव, कापसातील यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन यावर संशोधन केले जाईल.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अशोककुमार भारीमल्‍ला, शास्‍त्रज्ञ डॉ. मनोजकुमार माहावार, शास्‍त्रज्ञ डॉ. ज्‍योती ढाकणे लाड, पैदासकार डॉ. खिजर बेग यांनी करारावर स्‍वाक्षरी केल्‍या.

या वेळी कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक दीपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. व्‍ही. एन. नारखेडे, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थिती होती.

डॉ. मणी म्‍हणाले, ‘‘या करारामुळे दोन्‍ही संस्‍थेच्‍या कापूस पिकातील संशोधनास चालना मिळेल. कापसाच्या उत्‍पादन वाढीस मदत होईल.’’

डॉ. वासकर म्हणाले,‘‘नैसर्गिक रंगीत कापूस वाण निर्मिती व कापसाच्‍या सरळ वाणात ‘बीटी’चा अंतर्भाव यावर संशोधन करण्‍यात येईल.’’

डॉ. बेग म्हणाले, ‘‘कापड निर्मितीसाठी उच्च दर्जा आणि अधिक उत्पादन देणाऱ्या रंगीत कापसाचे वाण विकसित केले जातील. या करारामुळे दोन्‍ही संस्‍था एकत्रितरीत्या कापूस पिकांवर अत्‍याधुनिक संशोधन प्रकल्‍प राबविणार आहेत.

त्यात कापूस पिकांतील यांत्रिकीकरण, मूल्‍यवर्धन, काढणीपश्‍चात प्रक्रिया, कृ‍त्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पीक उत्‍पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणे, नॅनो तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आदी क्षेत्रात दीर्घकालीन संशोधनास चालना मिळेल.

विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी आणि शेतकरी यांच्‍या करिता प्रशिक्षण घेण्यात येईल. दोन्‍ही संस्‍थांच्‍या कापूस पिकांबाबतची माहिती, ज्ञान व कौशल्‍य यांची देवाणघेवाण करण्‍यास मदत होईल. कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेतील अत्‍याधुनिक प्रयोगशाळांतील धागा चाचणी प्रयोगशाळेची विद्यापीठाच्‍या संशोधनास मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance: हवामानाधारित फळपीक विमा योजनेत परभणीतील १ हजार २१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Solar Fencing Subsidy: सोलर फेन्सिंग अनुदानाचे आठ प्रस्ताव रखडले

Rural Economy: 'ग्रामीण अर्थव्यवस्थेत विविध कार्यकारी सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची'

Krishi Mahotsav: तुळजापूरमध्ये तुळजाभवानी जिल्हा कृषी महोत्सव

Agrowon Podcast: आल्याचा बाजारभाव स्थिर; सोयाबीनमध्ये नरमाई, कापसावरील दबाव कायम, काकडीला उठाव तर मका दबावाताच

SCROLL FOR NEXT