Rain Update agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : भीज पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पिकांना दिलासा

Kharif crop : नांदेड जिल्ह्यात सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे,

Team Agrowon

Nanded news : नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता.१८) सकाळी दहा वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस जिल्ह्यातही सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात झाला. परंतु पिकांसाठी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला होता. यापूर्वी एकही मोठा पाऊस झाला नसल्याने पिके केवळ जेमतेम पावसावरच तग धरुन होती. अशातच भारतीय हवामान विभागाने शनिवारी (ता.१५) आणि रविवारी (ता.१६) अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु या काळातही पावसाने हजेरी लावली नाही. यानंतर सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज होता. यानुसार जिल्ह्यात सोमवारी (ता.१७) अनेक भागांत हलका पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०५.१० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या २३.०१ टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यातही सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात झाला. परंतु पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड १०.४०, बिलोली २२.१०, मुखेड १६.४०, कंधार ९.९०, लोहा १३.७०, हदगाव ९, भोकर १९.४०, देगलूर १७.९०, किनवट ६.४०, मुदखेड १६.७०, हिमायतनगर १९, माहूर ५.७०, धर्माबाद २९.३०, उमरी १६.९०, अर्धापूर २२.३०, नायगाव १२.४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT