Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Team Agrowon

मुंबई : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Wet Drought) राज्यातील २५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या बाबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लवकरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत चार हजार सातशे कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिली आहे. आता ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मदत करण्यात येईल, असे सांगितले.

महसूल आणि कृषी विभागाला पंचनाम्यांचे आदेश दिले असून हे पंचनामे तातडीने पूर्ण करून तसा अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे ४० लाख,१५ हजार ८४७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यापोटी चार हजार सातशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT