POS Machine Agrowon
ताज्या बातम्या

POS Machine : चंद्रपूर जिल्ह्यात ९२२ पॉस मशीनधारकांची होणार चौकशी

Fertilizer Sales :अनुदानित खताची पॉस मशीनच्या माध्यमातून खताची विक्री करण्याचे आदेश आहेत. मात्र जिल्ह्यात ९२२ पॉस मशीनवरील या संबंधित व्यवहार संशयास्पद असल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : अनुदानित खताची पॉस मशीनच्या माध्यमातून खताची विक्री करण्याचे आदेश आहेत. मात्र जिल्ह्यात ९२२ पॉस मशीनवरील या संबंधित व्यवहार संशयास्पद असल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कृषी आयुक्‍तांच्या आदेशानुसार खत विक्रेत्यांची चौकशी होणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून अनुदान दिले जाते. खताची उचल करण्यासाठी परवानाधारक विक्रेत्यांना एफएमएस आयडी काढावी लागते. गोदामातून बाहेर काढलेले खत केवळ पॉस उपकरणाच्या मदतीने आवश्‍यक ती प्रक्रिया करून विकणे बंधनकारक आहे.

त्याकरिता शेतकऱ्याचे आधारकार्ड व इतर माहिती घेतली जाते. परंतु एक जून ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत रासायनिक खताची विक्री झालीच नाही, असे पॉस मशीनवरील नोंद सांगते. खरीप हंगाम असताना खत विक्री झाली नसल्याचा हा प्रकार संशयास्पद असल्याने या संदर्भाने चौकशीचे आदेश कृषी आयुक्‍तालय स्तरावरून देण्यात आले.

या संशयास्पद प्रकरणाचा तपास करण्याठी राज्यभर तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी सेवा केंद्रांची यादी तयार केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT