Labor Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Labor Shortage : उन्हाळी शेतीकामाला वेग, कामासाठी मजुरांची टाळाटाळ

तापमानाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला आहे. अशावेळी उन्हाळी शेतीकामांनाही वेग आला आहे.

Team Agrowon

Agriculture News केत्तूर ः करमाळा शहरासह ग्रामीण भागातही (rural Weather) सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. उजनी लाभक्षेत्रात उजनीच्या पाण्याची (Ujani Dam) मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने उष्णतेचा पारा जास्त जाणवत आहे.

तापमानाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला आहे. अशावेळी उन्हाळी शेतीकामांनाही वेग आला आहे. मात्र वाढत्या तापमानात कामासाठी मजूर येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या उसाची तसेच भाजीपाला पिके व इतर पिकांची खुरपणी करणे आवश्यक असताना उन्हामुळे महिला मजूर कामाला येत नाहीत. मजुरीचे दरही २५० ते ३०० रुपये एवढे आहेत. एकीकडे उन्हाळ्यामुळे पिके पाण्याला लवकर येत आहेत.

उन्हात पिके पिकवायला उन्हात कष्ट घ्यावे लागतात. परंतु बाजारभावाने ऐनवेळी दगा दिल्यास आर्थिक नुकसानीलाही तोंड द्यावी लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो, असे पोमलवाडी येथील भाजीपाला उत्पादक शिवाजी लोखंडे यांनी सांगितले.

त्यातच अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे व उत्पन्नात घट येत आहे. वाढणाऱ्या उन्हामुळे महिला मजूर डोक्यावर स्कार्फ घालून खुरपणी करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

Ganeshotsav Preparation: गणरायांच्या स्वागताची लगबग

Kisan Super Mart: शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र; ‘किसान सुपर मार्ट’चे उद्घाटन

Devsthan Land 7/12 Records: ‘देवस्थान जमीन’ कसणाऱ्यांच्या नावावर सातबारा करण्यासाठी लढा

Thrips In Cotton Crop: कपाशीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण कसे करावे? कीटकनाशक कोणते?

SCROLL FOR NEXT