Group Farming Agrowon
ताज्या बातम्या

Group Farming Subsidy : गटशेती अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला

Group Farming Subsidy Update : चार कोटींचा निधी; बारा जिल्ह्यांना होणार लाभ

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Group Farming :
पुणे ः अनुदानाअभावी कृषी प्रकल्प रखडलेल्या शेतकरी गटांना देण्यासाठी अनुदानाचा ४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता अखेर प्राप्त झाला आहे. त्याचा लाभ १२ जिल्ह्यांमधील शेतकरी गटांना होणार आहे.

समूह शेतीला चालना देण्यासाठी आधी शेतकऱ्यांचे गट बळकट करा, अशी मागणी राज्यभरातून झाली होती. त्यामुळे २०१७ मध्ये राज्य शासनाने बळकटीकरण योजना लागू केली.

‘गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीला चालना देणे’ असे नाव असलेल्या या योजनेतून राज्यातील ४०० पेक्षा जास्त गटांचे बळकटीकरण केले जात आहेत.

अर्धवट राहिलेल्या कामांना चालना देण्यासाठी शेतकरी गट सबलीकरण योजनेला दरवर्षी मुदतवाढ दिली जात होती. परंतु, २०२२-२३ मुदतवाढ दिली गेली नाही. शेतकऱ्यांनी मुदतवाढीची मागणी चालूच ठेवल्यामुळे १८ मे २०२३ रोजी राज्य शासनाने शेवटची मुदतवाढ दिली आहे.

“या मुदतवाढीबरोबरच शासनाने अनुदानाचीदेखील तरतूद केली आहे. मार्च २०२४ अखेर कामे पूर्ण करीत अनुदानाला पात्र होण्याची संधी शेतकरी गटांकडे आहे. परंतु, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही,” असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गटांचे प्रकल्प अर्धवट आहेत. ते पूर्ण करण्यासाठी ११ कोटी रुपयांची मागणी कृषी आयुक्तालयाने शासनाकडे केली होती.

परंतु, अर्थ विभागाने पहिल्या टप्प्यात चार कोटी रुपये दिले आहेत. अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी टप्प्याने निधी न देता पूर्ण अनुदान द्यावे, अशी गटांची अपेक्षा आहे.

“ मूळात राज्याच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचा लाभ २०१७ ते १९ या आर्थिक वर्षांमध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांनाच होईल. सध्या केवळ चार कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात आलेला आहे.

त्यातील ६० टक्के खर्च होताच आम्ही दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सहा कोटी रुपये देण्याची मागणी करणार आहोत. त्यामुळे शेतकरी गटांनी निधीची काळजी न करता तातडीने कामे पूर्ण करावीत,” असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
- मार्च २०२४ अखेर कामे संपवावी लागणार
- ही अखेरची मुदतवाढ असल्याचे सूत्रांचे म्हणणे
- दुसरा हप्ता सहा कोटींचा मिळणार


- चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला होणार लाभ
- अर्धवट कामांच्या पूर्णत्वासाठी पूर्ण अनुदान देण्याची गटांची मागणी

शेतकरी गटांच्या बळकटीकरणासाठी सहा वर्षांपूर्वी योजना लागू केली. गटांना देण्यासाठी निधी वेळेत दिला जात होता. परंतु, कोरोना काळात निधी न आल्यामुळे कामे थांबली होती.

आता चार कोटींचा निधी मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सहा कोटी रुपये मिळतील. त्यामुळे शेतकरी गटांचे सर्व अर्धवट प्रकल्प मार्गी लागतील.
- दशरथ तांभाळे, कृषी संचालक, आत्मा विभाग, कृषी आयुक्तालय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT