Sanjay Ruat Agrowon
ताज्या बातम्या

Sanjay Raut :नऊ तासांच्या चौकशीनंतर राऊत ईडीच्या ताब्यात

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) यांना आज अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीकडून ताब्यात घेण्यात आले.

Team Agrowon

पत्राचाळ प्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) यांना आज अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि पत्नी यांच्यासहित त्यांची चौकशी तब्बल २५ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.

दरम्यान, भांडुप येथील त्यांच्या राहत्या मैत्री या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. सकाळपासून आत्तापर्यंत त्यांची कसून चौकशी चालू होती. यादरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. पण अखेर राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.

काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले होते. पत्राचाळ प्रकरणात राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या 'मैत्री' या घरी चौकशी सुरू होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT