Tulajapur Rasta Roko Andolan Agrowon
ताज्या बातम्या

Tulajapur Rasta Roko Andolan : शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानीकडून रास्ता रोको आंदोलन

Tulajapur Swabhimani Shetkari Sanghtana : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी तुळजापूर तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे.

Team Agrowon

Tulajapur News : शेतकर्‍यांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकासमोर मंगळवार (ता.२२) रोजी दुपारी १२ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी तुळजापूर तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रासायनिक खतांची भाववाढ थांबवून ती शेतकर्‍यांना योग्य दरात उपलब्ध करून द्यावी, शेतकरी विकत घेत असलेल्या बियाणे, फवारणीसाठी लागणारे औषधे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधे यावर कोणत्याही प्रकारची जीएसटी लावू नये.

शेतकर्‍यांसाठी वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून तार कुंपण करण्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, चालू खरीप हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. यामुळे सद्यस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे तरी अनुदान स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी.

शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, चालू खरीप हंगाम पूर्ण धोक्यात असल्यामुळे पीकविमा मंजूर करावा, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून शेतकर्‍यांना न्याय मिळावा याकरिता हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदना द्वारे देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT