shekari vari agrowon
ताज्या बातम्या

Farmer March : टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांची वारी निघाली मुंबईच्या दिशेने, रयत क्रांती संघटना आक्रमक

Sadabhau Khot Latest Update : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्या वारी शेतकऱ्यांची या पदयात्रेला कराड येथून सुरुवात झाली. तीन दिवसात ती साताऱ्यात पोहोचणार असून त्यानंतर शेतकरी मंत्रालयावर धडक देणार आहे

Team Agrowon

Rayat Kranti Sanghana Long March : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्‍नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराडहून टाळ मृदुंगाच्या नादात वारी शेतकऱ्यांची या पदयात्रेला सुरुवात झाली.

ऊसाला चार हजार रुपये भाव देणारा “गुजरात पॅटर्न’ महाराष्ट्रात लागू करावा. दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटर हवाई अंतर असावे, अशी अट आहे. हे अंतर कमी करावे. शेतकऱ्यांना कर्जासाठी “सिबिल स्कोअर’ची अट बॅंकांनी काढून टाकावी. मूठभर लोकांच्या हितासाठी अस्तित्वात आलेला तुकडेबंदी कायदा रद्द करावा. शेतमालावर आयात शुल्क तातडीने लागू करावे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने द्यावा. कांद्याच्या प्रश्‍नासंदर्भात “नाफेड’ने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने कराड ते सातारा अशी पदयात्रा काढण्यात येत आहे.

या मागण्यांसाठी वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा कराड येथील प्रतिसंंगम परिसरात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून कराड येथून सातारकडे रवाना झाली. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार तीन दिवसांत केला नाही तर रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसह मुंबईला धडक देईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT