Monsoon Update agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : दक्षिण भारतात अतिवृष्टीचा अलर्ट, महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार

Monsoon in India : मान्सूनने भारताचा ९० टक्क्यांवर भाग व्यापला आहे. दरम्यान पुढच्या काही २४ तासांत मान्सून संपूर्ण भारतभर व्यापण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Monsoon Rain Update : मान्सूनचा पाऊस अद्याप सुरू झाला आहे की नाही याबाबत सगळीकडे तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान भारतात सध्या मान्सूनचा पाऊस सक्रीय होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

परंतु अनेक राज्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने दुबार पेरण्यांचे संकट ओढावले आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण भारत व्यापलेला नसल्याची माहिती IMD कडून देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत मान्सूनने भारताचा ९० टक्क्यांवर भाग व्यापला आहे. दरम्यान पुढच्या काही २४ तासांत मान्सून संपूर्ण भारतभर व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांत म्हणजे २ जुलैपासून दक्षिण भारतातील द्विपकल्पीय प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

आजपासून (ता. ३०) मंगळवारपर्यंत (ता. ०४) देशभरातील विविध भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आएमडीकडून देण्यात आला आहे.

पुढच्या ४८ तासांत दक्षिण भारतात होणाऱ्या पावसाचा परिणाम महाराष्ट्रावरदेखील होणार आहे.याचा सर्वाधिक प्रभाव पश्चिम घाटावर होणार असून, येत्या पाच दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. के. एस. होसाळीकर यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT