Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पूर्व विदर्भात पाऊस वाढणार

राज्याच्या काही भागांत पावसाच्या सरी सुरूच आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे आज (ता. २१) पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या काही भागांत पावसाच्या (Rainfall) सरी सुरूच आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे आज (ता. २१) पूर्व विदर्भात पावसाचा जोर (Rain Intensity In Vidarbh) वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast with Lightning) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशपासून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ते कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. आज (ता. २१) पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

वायव्य बंगालच्या उपसागरात, उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २२) उत्तर ओडिशा, उत्तर छत्तीसगडकडे येण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.

....

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT