Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

जिल्ह्यात जवळपास आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. दिवसभर ढगाळ वातावरणासह काही वेळा कडक ऊन पडत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्ह्यात जवळपास आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर पावसाचा जोर (Rain Intensity Pune) काहीसा ओसरला आहे. दिवसभर ढगाळ वातावरणासह (Cloudy weather) काही वेळा कडक ऊन पडत आहे. मात्र, दुपारनंतर वातावरणात काही प्रमाणात बदल (Climate Change) होऊन तुरळक ठिकाणी पाऊस बरसत आहे. गुरुवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मुळशी तालुक्यातील माले येथे ६२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. तर नद्या, नाले भरून वाहिल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. वरसगाव, पानशेत, खडकवासला, मुळशी या धरणांतून पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा काहीशी उघडीप दिली आहे.

हवेली तालुक्यातील चिंचवड येथे १४ मिलिमीटर, तर भोसरी येथे १० मिलिमीटर पाऊस पडला. तर पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, खेड, कळस, हडपसर या भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. थेऊर, उरुळीकांचन, वाघोली भागात पाऊस पडला नाही. मुळशीतील घोटावडे ३०, मुठे ४५, मावळमधील तळेगाव १२, काले १७, कार्ला ३३, खडकाळा २१, लोणावळा ५१, शिवणे

१४ वेल्ह्यातील वेल्हा ५९, पाणशेत ३२, विंझर ५५, आंबवणे ४६, जुन्नरमधील राजूर २२, डिंगोरे १२, खेडमधील वाडा १४, कुडे १८, आंबेगावमधील घोडेगाव १०, तर आंबेगावात १० मिलिमीटर पाऊस पडला. थेरगाव, पौड, पिरंगुट, वडगाव मावळ, भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, जुन्नर, नारायणगाव, आपटाळे, ओतूर, राजगुरुनगर, पाईट, चाकण, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस. कळंब, पारगाव, मंचर, मलठण, तळेगाव, पाबळ, सासवड. भिवडी, परिंचे भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT