Rain Agrowon
ताज्या बातम्या

Weather Forecast : उत्तर महाराष्ट्रात पाऊस

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने धुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Weather Update Maharashtra पुणे : उन्हाळ्याचा हंगाम (Summer Season) सुरू झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने धुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाने (Rainfall) हजेरी लावली आहे.

आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर उद्या (ता.७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm Forecast) होण्याचा इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखील तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश तापमानाची नोंद झाली.

अमरावती अकोला येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तर जळगाव, धुळे, सांताक्रुझ, नांदेड, वर्धा, बुलडाणा, चंद्रपूर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, दक्षिण कोकणापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उत्तर गुजरात आणि नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. शनिवारी (ता.४) दुपारनंतर धुळे, नाशिक जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वारे, विजांसह पावसाने हजेरी लावली.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.२ (१५.९), जळगाव ३७.६ (२३.०), धुळे ३७.० (१८.०), कोल्हापूर ३४.५ (२०.३), महाबळेश्वर ३०.२ (१७.४), नाशिक ३५.६ (२०.२), निफाड ३६.०(१५.५), सांगली ३५.५ (१९.२), सातारा ३४.९ (१७.५),

सोलापूर ३७.२ (२०.२), सांताक्रूझ ३७.० (२३.८), डहाणू ३३.४ (२५.१), रत्नागिरी ३६.९ (२२.७), छत्रपती संभाजीनगर ३४.३ (१६.६), नांदेड ३७.० (२०.४), परभणी ३५.४(१८.८), अकोला ३८.० (२२.४), अमरावती ३८.२(२१.९),

बुलढाणा ३७.०(२०.२), ब्रह्मपूरी ३८.८ (१८.४), चंद्रपूर ३७.० (२०.२), गडचिरोली ३५.२(१६.०), गोंदिया ३६.५ (१७.४), नागपूर ३६.१ (१८.३), वर्धा ३७.५(२०.२), यवतमाळ ३६.५ (१९.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT