Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला (Monsoon Rain) सूरूवात झाली आहे. आज (ता. २५) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) देण्यात आला आहे. तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार (Heavy Rainfall) पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात ढगांची दाटी होत आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या सरीवर सरी सुरूच आहेत. आज मुंबईसह, उर्वरित कोकण, महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच अरबी समुद्रातील मॉन्सूनचे प्रवाह, तसेच पावसाला पोषक स्थिती असल्याने राज्यात पाऊस पडत आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : ठाणे, पालघर, मुंबई, रायगड.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली.

मॉन्सून जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी २० जून रोजी संपूर्ण पूर्व भारत व्यापून उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रगती केली. संपूर्ण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व्यापला असून, बिहार, झारखंड, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मात्र मॉन्सूनने पुढे वाटचाल केलेली नाही. शुक्रवारी (ता. २४) मॉन्सूनची उत्तर सीमा ‘जैसे थे’ होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT