Soybean Damage Agrowon
ताज्या बातम्या

Soybean crop Damage : काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात

जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून वेगवेगळ्या भागात पाऊस होत आहे. शुक्रवारीही जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. हा पाऊस नायगाव, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड, किनवट, देगलूर, बिलोली, नांदेड, लोहा तालुक्यातील अनेक मंडळात झाला. शनिवारी (ता. १५) सकाळी साडेदहापर्यंत सरासरी १३.५० मिलीमीटर पावसाची (Rain Update) नोंद झाली. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान (Soybean Crop Damage) झाले आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून वेगवेगळ्या भागात पाऊस होत आहे. शुक्रवारीही जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस नायगाव, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड, किनवट, देगलूर, बिलोली, नांदेड, लोहा तालुक्यातील अनेक मंडळात जोरदार झाला. या पावसामुळे खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून ठेवले होते.

तेही पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक वाया जात आहे. हा पाऊस चांडोळा मंडळात ५६.३० मिलीमीटर झाला. तर बरबडा ५४, पेठवडज ५३.५०, बारुळ ५३.५०, रामतीर्थ ४१.५०, हदगाव ४१.३०, बाऱ्हाळी ३६, नरसी ३३.५०, कुंटूर ३१, येवती २९.३०, नायगाव २९.३०, मरखेड २६.८०, दहेली २६.३०, गोळेगाव २४, शेवडी २२.८०, जाहूर २१.३०, आंबुलगा २१.३०, जांब २०.५०, दिग्रस २०.५०, देगलूर २० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

शनिवारी (ता. १५) सकाळी साडेदहापर्यंत सरासरी १३.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ११३४.७० मिलीमीटरनुसार १३३.२४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पावसाने नुकसान झालेल्या पिकाबाबत विमा कंपनीला कळविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT