Rain  Agrown
ताज्या बातम्या

Rain : राज्यात पावसाची उघडीप कायम

राज्याच्या अनेक भागांत सध्या श्रावण सरी पडत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. मात्र पावसाचा जोर कमीच होता.

Anil Jadhao 

पुणेः राज्याच्या अनेक भागांत सध्या श्रावण सरी पडत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. मात्र पावसाचा जोर कमीच होता. उद्या सकाळपर्यंत हवामान विभागात राज्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली.

कोकणात पावसाचं प्रमाण काहीसं वाढलंय. पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, विक्रमगड आणि वाडा या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर, माथेरान, म्हसला, पेन, सुधागड या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. तर रत्नागिरी जिल्ह्यातील वाकवली मंडळात ५१ मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी या मंडळांमध्ये श्रावण सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती कायम होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला. तर पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी या मंडळांमध्येही पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस पडला. ओझरखेडा, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगणा मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी श्रावण सरी पडल्या. सांगली जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये हलक्या सरी झाल्या. सातारा जिल्ह्यात काही भागांत मध्यम पाऊस झाला.

मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम होती. औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांत दिवसभर पाऊस नव्हता. तर विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रावण सरी पडल्या. मात्र सर्वत्र पावसाचा जोर कमीच होता.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. तर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT