Railway  Agrowon
ताज्या बातम्या

Railway : रेल्वे चौपदरीकरण काम संथगतीने

पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू चौपदरी करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. अपुरा निधी, रेंगाळलेले भूसंपादन व अन्य काही तांत्रिक समस्यांमुळे एमयूटीपी- ३ अंतर्गत प्रकल्पाच्या कामांची गती मंदावली आहे.

Team Agrowon

पालघर : पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू चौपदरी करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. अपुरा निधी, रेंगाळलेले भूसंपादन (Land Acquisition) व अन्य काही तांत्रिक समस्यांमुळे एमयूटीपी- ३ अंतर्गत प्रकल्पाच्या कामांची गती मंदावली आहे. सध्या विरार-डहाणूदरम्यान दोनच मार्गिका असून या मार्गावरून लोकलबरोबरच मेल एक्स्प्रेसही धावतात. त्यामुळे लोकांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. हे चौपदरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्थेने केली आहे.

पश्चिम रेल्वे सध्या एक्स्प्रेस गाड्यांची वाढ करीत असून उपनगरीय रेल्वे गाड्या मात्र वाढवल्या जात नाहीत. त्यातच एक्स्प्रेस गाड्यांमुळे उपनगरीय गाड्या नेहमीच उशिरा पोहचत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची मात्र मोठी कुचंबणा होत आहे.

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्प हाती घेतला आहे; मात्र या प्रकल्पात २४ हजार खारफुटींची झाडे अडसर बनली आहेत. ही खारफुटी झाडे तोडण्यात येणार असून त्यासाठी मुं याचिका करण्यात आल्याची माहिती एमआरव्हीसी अधिकाऱ्याने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT