Rahul Gandhi  Agrowon
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाचा झटका; पुनर्विचार याचिका फेटाळली

Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Team Agrowon

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव प्रकरणी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत ट्रायल कोर्टाचा दोषी ठरवले होते. याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यावर न्यायालयाने सत्र न्यायालयाच आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला.

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 'मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये फौजदारी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी अपील करण्यात आले होते.उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी करताना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आणि उन्हाळी सुट्टीनंतर अंतिम आदेश देऊ असे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

आता सुरत उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने सत्र न्यायालयाच आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला. या निकालामुळे राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, राहुल गांधी यापुढे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत, तसेच ते त्यांच्या संसद सदस्य (खासदार) पदावरील निलंबन मागे घेण्याची मागणी करू शकणार नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध तो सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT