Rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : एक लाख ६३ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरु आहे. आजपर्यंत जिल्ह्याभरात एक लाख ६३ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

नांदेड : नांदेड जिल्ह्यात रब्बीची (Rabi Season) पेरणी सुरु आहे. आजपर्यंत जिल्ह्याभरात एक लाख ६३ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. यात सर्वाधिक एक लाख ४६ हजार ६६४ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी (Chana Sowing) झाली आहे. तर सात हजार ६२ हेक्टरवर रब्बी ज्वारी, (Rabi Jowar Sowing) पाच हजार ५५९ हेक्टरवर गहू,

तीन हजार हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ७२.७० टक्क्यांनुसार एक लाख ६३ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले होते.

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

हरभरा ः एक लाख ४६ हजार ६०४, गहू ः पाच हजार ५५९, रब्बी ज्वारी ः सात हजार ६२, रब्बी मका ः ९१८, करडई ः तीन हजार १४ एकूण एक लाख ६३ हजार ३१६ हेक्टर.

यात बियाणे तसेच खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या होत्या. शेतकऱ्यांनी यंदा जमितीन ओलावा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हरभऱ्याच्या पेरणीला प्राधान्य दिले होते. जिल्ह्यात हरभरा पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ६३ हजार ३७० हेक्टर आहे.

आजपर्यंत एक लाख ४६ हजार ६०४ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. यासोबतच गव्हाचे पेरणीक्षेत्र २९ हजार ७१७ आहे. आतापर्यंत पाच हजार ५५९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे पेरणीक्षेत्र ३२ हजार ६९९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात पेरणी सात हजार ६२ हेक्टरवर झाली आहे. सध्या जिल्ह्यातील रब्बीची पेरणी ७२.७० टक्क्यांनुसार एक लाख ६३ हजार ३१६ हेक्टरवर पोचल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे.

यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्यामुळे रब्बी हंगामात पेरणी अधिक होण्याचा अंदाज आहे. सध्या शेतकरी हरभरा पेरणीवर अधिक भर देत आहेत. शेतीसाठी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर गव्हाच्या पेरणीला गती येईल.- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT