Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : पाच जिल्ह्यांत १६ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी

लातूर : विभागातील पाच जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असून १६ लाख ७९ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या १२३ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

Team Agrowon

लातूर : विभागातील पाच जिल्ह्यात रब्बी हंगामातील (Rabi Season) सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असून १६ लाख ७९ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या १२३ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी (Rabi Sowing) झाली आहे.

पीक निहाय पेरणी व पीक स्थिती...

ज्वारी ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून आत्तापर्यंत २ लाख ९८ हजार १०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या ते पोटरी अवस्थेत आहे.

नांदेड जिल्हयात काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

गहूः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असून आत्तापर्यंत १ लाख ५४ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ९८ टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या, मुकूटमुळे फुटण्याच्या व काही प्रमाणात ओंबी भरण्याच्या अवस्थेत आहे.

हरभरा ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून आत्तापर्यंत ११ लाख ६० हजार २९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी १४८ टक्के आहे. पीक सद्या फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे.

विभागातील सर्व जिल्हयात घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणीबाबत क्षेत्रीय स्तरावरून इमामेक्टीन बेंझोएट ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तसेच विभागातील सर्व जिल्हयात काही ठिकाणी पिकावर अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव आढळून येत आहे.

रब्बी मका ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ९७१ हेक्टर असून आत्तापर्यंत १७ हजार ७६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे.

करडई ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असून आत्तापर्यंत २३ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १२३ टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या व फुलोरा अवस्थेत असून काही प्रमाणात पिकावर मावा किडीचा प्रादूर्भाव आढळून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT