Sangli Rabbi Perani Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : सांगलीत १ लाख ८५ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा

Team Agrowon

Sangli Rabi Sowing News ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात (Rabi Sowing in Sangli District) १ लाख ८५ हजार ३७५ हेक्टरवर म्हणजे ९७ टक्के पेरणी (Sowing) झाली आहे. मका पिकाचे (Maize Acreage) सरासरी क्षेत्र १८ हजार १५२ हेक्टर इसून २० हजार ४६२ हेक्टरवर पेरा झाला आहे.

सर्वाधिक पेरा मका पिकाचा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात गतवर्षी रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख १७ हजार ५१८ हेक्टर असून २ लाख ७३९ हेक्टरवर पेरा झाला होता. सर्वाधिक पेरा मका पिकाचा झाला होता.

ज्वारी, गहू पिकांचादेखील सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरा झाला होता. गतवर्षी डिसेंबरअखेर पाऊस असल्याने पिकांचे नुकसानही झाले होते.

यंदाच्या हंगामात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर होते. त्यापैकी १ लाख ८५ हजार ३७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गत हंगामात मका पिकाची १९ हजार १४२ हेक्टरवर पेरणी झाली होती.

चालू हंगामात २० हजार ४६२ हेक्टरवर पेरा झाला असून १ हजार ३२० हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा गव्हाची पेरणी १८ हजार ५९८ हेक्टरवर झाली आहे.

गेल्या वर्षी करडई पिकाची लागवड होण्यासाठी कषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोस्ताहित केले होते. त्यामुळे गत हंगामात करडईचे सरासरी क्षेत्र ९९५ हेक्टर असून ४९ हेक्टरवर पेरा झाला होता. यंदाच्या हंगामात करडईचे सरासरी क्षेत्र ३६५ हेक्टर आहे.

त्यापैकी १० हेक्टरवर करडईची लागवड झाली आहे. जत तालुक्यात करडई पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे. सूर्यफुलाचा १०१ हेक्टरवर पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सूर्यफुलाच्या क्षेत्रात ७५ हेक्टरने वाढ झाली आहे.

तालुका - क्षेत्र

मिरज - २४६३६

जत - ७७१७४

खानापूर - ६२६०

वाळवा - ११७५३

तासगाव - ९३५०

शिराळा - ४८०५

आटपाडी - १८९८३

कवठे महांकाळ - १८६९६

पलूस - ४३७१

कडेगाव - ९३९४

एकूण - १८५३७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT