Rabbi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabbi Season : रब्बीची पेरणी ९० टक्क्यांवर

खानदेशात सुमारे चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होईल, असे संकेत सुरवातीपासून होते. कारण खानदेशात काळ्या कसदार जमिनीत चांगला ओलावा असल्यास दिवाळीलाच कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी सुरू होते.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी (Rabbi sowing) ९० टक्क्यांवर पोचली आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. कांदा लागवड (Onion cultivation) व बाजरीची पेरणी सुरूच आहे. पेरणी १०० टक्क्यांवर जाईल, असे दिसत आहे.

खानदेशात सुमारे चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होईल, असे संकेत सुरवातीपासून होते. कारण खानदेशात काळ्या कसदार जमिनीत चांगला ओलावा असल्यास दिवाळीलाच कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी सुरू होते.

अर्थात यंदा पाऊस चांगला झाला. ओलावा टिकून होता. हरभऱ्याची वेळेस पेरणी झाली आणि पीक जोमात आहे. घाटे लगडले आहेत. त्यावर दोन फवारण्यादेखील शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत.

हरभरा पिकात काहींनी एकदा सिंचन केले आहे. काबुली हरभरा पीकही जोमात आहे. खानदेशात सुमारे दोन लाख हेक्टरवर हरभरा पीक आहे.

जळगावमधील चोपडा, यावल, जामनेर तालुक्यांत केळीची काढणी ९० टक्के पूर्ण झालेल्या बागांत शेतकऱ्यांनी काबूल हरभऱ्याची पेरणी केली आहे.

ठिबकवर अनेकांनी हरभरा पेरणी केली आहे. या पाठोपाठ खानदेशात सुमारे ७० हजार हेक्टरवर दादर ज्वारी व संकरित, संशोधित ज्वारीची पेरणी झाली आहे. दादर ज्वारीची सुमारे ३५ हजार हेक्टरवर पेरणी आहे. ज्वारी पीकही जोमात आहे.

मक्याची लागवडही सुमारे ४० हजार हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २८ हजार हेक्टरवर, धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १२ ते साडेबारा हजार हेक्टरवर मका पीक आहे.

गव्हाची पेरणी मात्र खानदेशात स्थिर आहे. काही तालुक्यांत गहू पेरणी कमी झाली आहे. नंदुरबारमधील शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील एरंडोल, चोपडा या भागात गहू पेरणीचे क्षेत्र स्थिर आहे. खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर गहू पीक आहे.

कांदा लागवड सुरूच

कांदा लागवड पुढील आठ ते १० दिवस सुरू राहील. अनेकांनी त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. तयार रोपांचे दर परवडणारे नाहीत.

बाजरीची पेरणी सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टरवर होईल. तसेच कांदा लागवडदेखील साडेसहा हजार हेक्टरवर अपेक्षित आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कांदा लागवड अडीच हजार हेक्टरवर शक्य आहे. धुळ्यातील कांदा लागवड स्थिर राहील. तेथे सुमारे तीन हजार हेक्टरवर कांदा लागवड होवू शकते, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT