Water Defect Agrowon
ताज्या बातम्या

Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या

Pune Under Water Crisis : पुणे जिल्ह्यात वीस टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या (Water Defect) झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, जुन्नर आणि खेड या चार तालुक्यांतील २४ गावांमधील १०५ वाड्या-वस्त्यांना २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे या २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांनी तहान टँकरद्वारे भागविली जात आहे.

मागील वर्षी मॉन्सूनचे वेळेवर झालेले आगमन, दमदार पाऊस यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली. तसेच परतीचा पाऊसही समाधानकारक झाला. त्यामुळे यंदा काहीशा उशिराने जिल्ह्यात टँकर सुरू करावे लागले आहेत.

आता पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

मे महिनाअखेर, जूनच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येमध्ये आणि पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून १९ विहिरी अधिग्रहीत
आंबेगावातील ८ गावांमधील ३५ वाड्यावस्त्यांमध्ये ८, भोरमधील एका गावात एक, जुन्नरमधील ८ गावांमधील ३२ वाड्या-वस्त्यांना ६ टॅंकर तर खेडमधील ७ गावांमधील ३८ वाड्यावस्त्यांमध्ये पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रशासनाने १९ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. त्याद्वारेसुद्धा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या २४ गावांमधील ३९ हजार ६०७ नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT